Saturday, September 5, 2026
Homeगोंदियाकिती बदमाश म्हणावे चोरटे; चक्क देवाचे दोन डोळेही नेले चोरून..!

किती बदमाश म्हणावे चोरटे; चक्क देवाचे दोन डोळेही नेले चोरून..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चोरी करणारे चोरटे कधी,काय चोरी करतील याचा काही नेम नाही.चोरांनी एखादी योजना आखली तर ती फत्ते केल्याशिवाय राहत नाही.मात्र,ज्या ईश्वराची श्रद्धा मनात बाळगून भक्ती भावाने पूजा- अर्चना केली जाते,अश्या ईश्र्वरावरच डल्ला मारल्या जात असेल तर त्यांच्या सारखे महामूर्ख चोरटे कुणीच नाही.असे म्हणण्याची आता वेळ आली आहे.अज्ञात चोरट्यांनी एखाद्याच्या घरावर वा बँकेत चोरी केली नाही,तर चक्क देवाच्या मंदिरातून देवाचेच चांदीचे दोन डोळे चोरले असल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील ग्रामपंचायत परिसरात असलेल्या पुरातन जागृत हनुमान मंदिरात घडली आहे.अज्ञात चोरटे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हनुमानाच्या मुर्तीच्या छातीवरील शेंदूरही काढून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.चोरी करण्यामागे अघोरी कृत्य करणाऱ्यांचा सहभाग असावा,अश्या चर्चांना परिसरात उधाण आले आहे.प्रकरणी गावकऱ्यांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,परंतु घटनेस आठ दिवस लोटूनही अजूनपर्यंत चोरट्यांचा थांगपत्ताच लागेनासा झाल्याने गावात नाना तऱ्हेचे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.आजच्या कलयुगातील चोरटे किती बदमाश झालेत,हे सदरच्या प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.पैश्याच्या लालचेने काहीजण देवालाही सोडत नाहीत तर तुम्हा आमची काय पर्वा? ही कल्पनाच न केलेली बरी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!