- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-कार रिव्हर्स(मागे)घेतांना चिमुकला अचानक मागे आल्याने कारच्या चाकाखाली येऊन अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव शहरातील घोटी येथे घडली.फैज जमीर शेख असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
समीर मोहम्मद पाकीद शेख वय ३६ वर्षे,रा.घोटी हा व्यक्ती एमएच-३५/डीसी-१७४५ क्रमांकाची कार आपल्या घरीच रिव्हर्स घेत होता.दरम्यान,त्यांच्याच घरचा अडीच वर्षाचा फैज घरातून बाहेर पडला.कार चालकाच्या लक्षात आले नसल्याने फैजला कारची धडक बसली.त्यामुळे त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला मार लागला.यात तो बेशुद्ध पडला.त्याला तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.परिस्थितीचे भान न ठेवता आणि निष्काळजीपणे वाहन चालवून बालकाच्या मृत्यूला जबाबदार ठरल्यामुळे गोरेगाव पोलिसांनी कारचालक समीर मोहम्मद शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
- Advertisement -

