Thursday, October 8, 2026
Homeनागपूरकाय सांगता..? सावळा गोंधळ असलेले संपूर्ण पोलीस पाटील पद रद्द.. -...

काय सांगता..? सावळा गोंधळ असलेले संपूर्ण पोलीस पाटील पद रद्द.. – उच्च न्यायालयाचा निर्वाळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या विविध गावांमधील पोलिस पाटील भरतीची जाहिरात १६ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर ८ व ९ एप्रिल २०२३ रोजी लिखित परीक्षा,त्यानंतर १० व ११ एप्रिल रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.१२ एप्रिल २०२३ रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. मात्र,काही उमेदवारांनी मुलाखत प्रक्रियेत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार,जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दाखल घेत मे २०२३ मध्ये सादर केलेल्या अहवालात निवड प्रक्रिया बोगस व अपारदर्शक पद्धतीने झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.या आधारावर ४ जुलै २०२३ रोजी निवड प्रक्रिया व नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले.त्यामुळे पात्र उमेदवारांनी या निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण म्हणजेच मॅटमध्ये आव्हान दिले होते.पण,न्यायाधिकरणाने जुलै २०२५ मध्ये राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवला.परत याविरोधात पात्र उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यानुसार उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद व अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत झालेली निवड प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.प्रकरणी न्यायलयाने मॅटच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत उमेदवारांच्या याचिका धुडकावून लावल्या.मुलाखत घेणाऱ्या समितीची नियुक्ती शासकीय नियमांनुसार झाली नव्हती,असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे.समितीत उपविभागीय अधिकारी,पोलिस उपविभागीय अधिकारी, समाज कल्याण अधिकारी,आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार असायला हवे होते.मात्र,त्यांच्या जागी त्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या.अशा प्रातिनिधिक नियुक्त्या कायद्याने मान्य होत नाहीत, असे न्यायालयाने नमूद करत मुलाखत प्रक्रियेतील गुणांकनातही गोंधळ आढळला.काही समिती सदस्यांनी उमेदवारांना संख्येने गुण दिले,तर काहींना *(स्टार)चिन्हाने दिले.मुलाखती फक्त १ ते ३ मिनिटांत संपवण्यात आल्या.विशेषतः सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये आवाजही नव्हता,असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले व भंडारा जिल्ह्यात २०२३ साली झालेली पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया रद्दबातल केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!