- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जंगली डुक्कर म्हटले की,अंगावर काटा आणि शहरे आणण्यासारखे आहे.जंगली डुक्कर एखाद्याच्या शेतावर वा जंगलात पहावयास मिळतो.अशातच वास्तव्यास असणाऱ्या भरवस्तीतच जंगली डूकरांचा कळप दिसला तर अनेकांची घाबरगुंडी होऊन तारांबळ उडल्याशिवय राहणार नाही.असाच प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध येथे नुकताच उघडकीस आला आहे.कळपातील एका जंगली डूकराने चक्क घराच्या छतावरच आश्रय घेतला.नागरिकांच्या लक्षात येताच वस्तीतील लोकांची काहीकाळ उडाली धांदल उडाली होती.
नवेगावबांध हे नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो.मंगळवारी रानडुकरांचे कळप येथील वस्तीत शिरले.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.एका डुकराने बसस्थानक परिसरातील जिभकाटे यांच्या घराच्या छतावर आसरा घेतला होता. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.माहिती मिळताच प्रादेशिक वनविभागाच्या जलद बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबविला.छतावर जाळी लावून रानडुकराला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र,सदर रानडुकराने वनविभागाच्या पथकाला भूल देत इमारतीच्या मागच्या बाजूला उडी मारत रेल्वे मार्ग ओलांडत जंगलाच्या दिशेने पळ काढला.त्यानंतर नागरिकांनी सुटकेच्या निःश्वास सोडला.
- Advertisement -

