Saturday, October 17, 2026
Homeउमरेडकडक उन्हाच्या झळा सहन करत बसलेल्या प्रवाशांना दिलासा; माजी आमदारांनी एक फोन...

कडक उन्हाच्या झळा सहन करत बसलेल्या प्रवाशांना दिलासा; माजी आमदारांनी एक फोन घुमवला अन्..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
उमरेड(नागपूर):-आज दुपारचे एक वाजले होते.कडक उन्हाच्या झळा सहन करत उमरेडच्या आगारात नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.उमरेड आगारातून सुटणारी उमरेड-हिंगणा ही बस नियोजित वेळेत न आल्याने सुमारे दीडशे ते दोनशे प्रवासी उष्णतेत प्रतीक्षा करत उभे होते.अनेकजण तातडीच्या कामानिमित्त निघालेले असतांना,बस विलंबामुळे त्यांना शारीरिक थकवा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता.विशेष म्हणजे,चौकशी कक्षाकडूनही प्रवाशांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते महेश बिपटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आणि ही बाब तात्काळ उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीची जाणीव होताच पारवे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आगारप्रमुखांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले व सविस्तर चर्चा केली.या चर्चेनंतर अवघ्या पाच मिनिटांच्या आत बसचे नियोजन करण्यात आले.यामुळे बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळून कडक उन्हात होणारी प्रतीक्षा थांबली आणि प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.या तात्काळ आणि संवेदनशील हस्तक्षेपाबद्दल बसस्थानकावर उपस्थित प्रवासी,महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांनी माजी आमदार सुधीर पारवे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “गरजेच्या वेळी धावून येणारा लोकप्रतिनिधी” अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.या कृतीतून पारवे यांनी पुन्हा एकदा सामान्य नागरिकांप्रती असलेली बांधिलकी आणि तत्परता दाखवून दिली,अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून देण्यात आली.उष्णतेच्या तडाख्यात अडकलेल्या प्रवाशांना त्वरित दिलासा देत,लोकांच्या अडचणी सोडविण्यात पारवे यांनी दाखविलेली कार्यतत्परता सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!