Sunday, June 14, 2026
Homeगडचिरोलीएका रुपयात काढा पीक विमा; अंतिम मुदत १५ जुलै पर्यंत

एका रुपयात काढा पीक विमा; अंतिम मुदत १५ जुलै पर्यंत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली  :- खरीप हंगाम २०२४ करिता कर्जदार  व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे.केवळ  एक रुपया प्रती अर्ज एवढी रक्कम भरुन पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करण्याचे आवाहन,कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.खरीप हंगाम २०२० पासून तीन वर्षासाठी राज्यात ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगाम या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी वीमा क्षेत्र घटक धरुन ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. 

विमा कंपन्यांचे नाव व टोल फ्री क्रमांक👇

गडचिरोली जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि.नेमण्यात आली असून १८००१०२४०८८ हा टोल फ्री क्रमांक आहे.

पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश👇

हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान,पेरणी पासून काढणी पर्यंतच्या  

कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत समावेश करण्यात आला आहे.

आधारकार्ड,७/१२ उतारा, ८ अ, आधार संलग्न बॅक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बॅक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे.  

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची भाईगिरी; तलवारीने केक कापून हवेत फिरवली पिस्तूल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मित्राच्या वाढदिवसानिमित्त तलवारीसारख्या हत्याराने केक कापत हवेत पिस्तूल फिरवून तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाईगिरी दाखवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना...

शेतकरी चिंतातुर; मृग नक्षत्रानेही मारली दडी..!

उद्रेक न्युज वृत्त :-पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा एकीकडे हवामानाच्या अनिश्चिततेशी, तर दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाशी सामना करत आहे.मृग नक्षत्राचा जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही दमदार...

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!