Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोली"एक हात मदतीचा” ग्रुपने रुग्णांसोबत केली दिवाळी साजरी..

“एक हात मदतीचा” ग्रुपने रुग्णांसोबत केली दिवाळी साजरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दिवाळी म्हटले की नवनवीन पोशाख,फटाके,चिवडा,चकल्या आणि आनंदाचे क्षण डोळ्यासमोर येतात.पण काहीजण असे असतात की, आनंदाचे क्षण प्रकृतीवस्थामुळे गमावून बसतात.त्यातच ज्यांची तब्बेत साथ देत नाही,अश्यांना सणाच्या दिवसांमध्येही रुग्णालयात राहावे लागत असते.त्यामुळे अशा रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी “एक हात मदतीचा” या ग्रुप सदस्यांनी एक अनोखा उपक्रम राबवत आज, सोमवार २० ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांसोबत दिवाळी साजरी केली.दिव्यांनी,फुलांनी आणि गोड पदार्थांनी सजलेले वातावरण क्षणभरासाठी रुग्णांच्या मनात आनंदाने न्हाऊन गेले होते.“एक हात मदतीचा” या ग्रुपच्या वतीने दरवर्षी एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात येतो.उपक्रम राबवित असतांना कुठल्याही प्रकारची देणगी किंवा भेट वस्तू घेतल्या जात नाही,तर उपक्रमावर येणारा संपूर्ण खर्च ग्रुपमधील सर्व सदस्य स्वतःच्या योगदानातून करत असतात.यंदा रुग्णांसोबत दिवाळी साजरी करीत असतांना रुग्णांच्या चेहऱ्यावर काहीकाळ उमटलेला आनंद पाहून प्रत्येक सदस्य भावुक झाला होता.उपक्रम प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनीष मेश्राम,डॉ.धुर्वे “एक हात मदतीचा” ग्रुपचे सदस्य स्नेहल पद्मा,दिलीप संतोषवार, जयेश देशमुख, शरद गिऱ्हेपुंजे,मंगेश मुनघाटे,रवी भंडांगे,मुकेश बरदाळकर,अबुल बंबोळे,संदीप मोटघरे,स्वप्नील श्यामकुवर,गोविंद दिघोरे,पवन संतोषवार, विलास दिवटे, आकाश चौधरी,साहिल बावणे,अक्षय इंगळे,सनी बारसागडे,लीलाधर हेटकर,विकास काबेवार,अमोल ककनालवर सह अन्य सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी प्रमोद शेरकर व बालु येरोजवार यांनी वाढदिवसानिमित्त आर्थिक मदत करून सामाजिक संवेदना व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!