Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीउद्योगांअभावी बेरोजगार तरुणांची फौज…-तरुण आजही औद्योगिक क्रांतीच्या प्रतीक्षेतच..

उद्योगांअभावी बेरोजगार तरुणांची फौज…-तरुण आजही औद्योगिक क्रांतीच्या प्रतीक्षेतच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगष्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली.संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती.जिल्ह्याला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक विकासकामे झाली.पण तरीही येथे मोठे उद्योग आले नाही.सध्या स्थितीत जिल्ह्यात सुरजागड-कोनसरी प्रकल्प जरी सुरू असला तरीही जिल्ह्यात अद्याप एकही मोठा प्रकल्प सुरू झालेला नाही.आज नाही तर उद्या जिल्ह्यात मोठा उद्योग उभा राहील,या आशेवर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण हात टेकून बसले आहेत.त्यामुळे आज जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली आहे आणि होतच आहे.रोजगाराच्या नावाखाली लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने दिली जातात. मात्र,त्यांची पूर्तता होत नाही.त्यामुळे तरुणांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्याने विकासाचा गौरव केला असला,तरी येथील अनेक तरुणांना आजही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न कायम आहे. अश्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील दुसरा कोणताही मोठा प्रकल्प नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधात इतर शहरात जात आहेत.दुसरीकडे जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरा कोणताही रोजगार नसल्याने सर्वसामान्य नागरिक रोजगाराच्या शोधात इकडे-तिकडे भटकत असतात.उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जिल्ह्यातील मजूर इतर शहरात रोजगारासाठी जातात.आपल्या कुटुंबाची काळजी असल्याने ते वाटेल ते काम करायला तयार असतात.त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण गाव सोडत नाहीत.गडचिरोली जिल्ह्याला अनेक समस्यांनी घेरले आहे.जिल्ह्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते.ज्यामध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आशा असते.जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे.मात्र जिल्ह्यात रोजगाराबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत.यामुळे येथील तरुण आजही औद्योगिक क्रांतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!