- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS)च्या वतीने उद्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथील वैनगंगा इन्क्युबेशन फाउंडेशन येथे विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.हे सत्र दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे.जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.
- Advertisement -

