Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला शेवटची तारीख; पदवीधर असलेल्या नागरिकांनी फॉर्म भरून मतदार यादीत नावे समाविष्ट...

उद्याला शेवटची तारीख; पदवीधर असलेल्या नागरिकांनी फॉर्म भरून मतदार यादीत नावे समाविष्ट करून घ्यावित.. – पदवीधर मतदार संघात सहा जिल्ह्यांचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा, गोंदिया आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून पात्र पदवीधरांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ फॉर्म(Form18)भरून अर्ज करण्याची उद्या,गुरुवार ६ नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख असल्याने पदवीधर असलेल्या नागरिकांनी फॉर्म भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे.कारण की,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पदवीधर मतदार संघाची निवडणूक पार पडणार आहे.यात पदवीधर मतदार संघातून एक आमदार निवडून द्यायचा असतो. त्यासाठी केवळ पदवी प्राप्त आणि मतदार यादीत नाव समाविष्ट असलेलेच मतदान करू शकतात.त्यामुळे नोंदणी करणे आवश्यक आहे.
मतदार नोंदणीसाठी नमुना १८ भरणे आवश्यक असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक-६ नोव्हेंबर,२०२५ पर्यंत आहे.अर्ज स्वीकारल्यानंतर हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल.प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी २५ नोव्हेंबर २०२५  रोजी होईल.याच दिवसापासून दावे व हरकती स्वीकारण्यास सुरुवात होईल,ज्याची अंतिम मुदत १० डिसेंबर,२०२५ आहे.दावे व हरकतींवर २५ डिसेंबर २०२५ पर्यंत निर्णय घेऊन पुरवणी यादी तयार केली जाईल.मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ३० डिसेंबर,२०२५ रोजी होणार आहे.
नागपूर पदवीधर मतदार संघात मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी अर्जदाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवी परीक्षा किंवा तत्सम समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.पदवी परीक्षा अर्हता दिनांकाच्या (०१/११/२०२५) तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली असावी.तीन वर्षांच्या कालावधीसाठी विद्यापीठाने निकाल जाहीर/प्रसिध्द केल्याचा दिनांक गृहीत धरला जाईल,दीक्षांत समारंभाची तारीख नाही.
मतदाराचे नागपूर पदवीधर मतदार संघात सर्वसाधारण रहिवास असावे आणि तो भारताचा नागरिक असावा. जरी तुमचे नाव सन २०२० च्या मतदार यादीत समाविष्ट असले तरी,२०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार होत असल्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पदवीधर मतदारसंघाकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी विहित नमुना १८ मध्ये अर्ज दाखल करायचा आहे.नमुना १८ चा अर्ज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय,तहसिल कार्यालय येथे नियुक्त केलेल्या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे करता येईल.
पदवीधर मतदार टपालाद्वारे नमुना १८ आवश्यक साक्षांकित केलेल्या कागदपत्रांसह सादर करू शकतो. गठ्ठा पध्दतीने (मोठ्या संख्येने)नमुना १८ अर्ज वैयक्तिकरित्या किंवा टपालाद्वारे,BLA द्वारे अथवा राजकीय पक्ष यांना सादर करता/स्वीकृत केला जाणार नाही.तथापि,विभाग प्रमुख त्यांचे अधिनस्थ पात्र पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांचे नमुना १८ चे दावे एकत्रित सादर करू शकतात.तसेच,कुटुंबातील व्यक्ती त्याच्या कुटुंबातील पात्र पदवीधर मतदाराचा दावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल करू शकतो,परंतु यासाठी दोघांचा रहिवास पत्ता सारखा असणे अनिवार्य आहे.
दाव्यासोबत खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक राहील:
विद्यापीठाने निर्गमित केलेली पदवी (Degree),किंवा
सरकारी दप्तरी पदवीबाबतची नोंद,किंवा
विद्यापीठाने पदवीधारण केल्याबाबत निर्गमित केलेले नोंदणी कार्ड,किंवा पदवीच्या अंतिम वर्ष उत्तीर्ण केलेली मूळ गुणपत्रिका.
त्या-त्या जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी विहित नमुना-१८ अर्ज आवश्यक पुराव्यांसह उद्या,गुरुवार ६ नोव्हेंबर,२०२५ पर्यंत दाखल करून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!