उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप करत देशातील प्रमुख १० कामगार संघटनांनी उद्या,बुधवार ९ जुलै रोजी भारत बंदची घोषणा केली आहे.सरकारच्या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना,त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर यांनी म्हटले की, देशभरातून सुमारे २५ कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार असून,शेतकरी आणि ग्रामीण कामगारही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवतील. देशव्यापी संपादरम्यान अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहू शकतात.त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरती होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे १७ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती.पण,केंद्र सरकारकडून त्याला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.त्यामुळे ९ जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे.केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या १० वर्षांपासून घेण्यात आली नाही. त्याचवेळी सरकारने चार कामगार कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यामुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. टपाल,कोळसा खाणी,बँका,विमा,महामार्ग तसेच बांधकाम क्षेत्रातील जवळपास अंदाजे २५ कोटी कामगार आणि कर्मचारी उद्या,बुधवार ९ जुलै रोजी देशभरात संपावर जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.संपामुळे अनेक महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
उद्याला भारत बंदची घोषणा; महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

