Tuesday, October 27, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून सुरु होणार सटोरी गँगचा अड्डा; गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत..! -...

उद्यापासून सुरु होणार सटोरी गँगचा अड्डा; गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत..! – स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष; एलसीबी पथकाचे लक्ष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आले असून स्थानिक पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याने नाईलाजास्तव जिल्हा स्तरावरील एलसीबी पथकाला विविध प्रकारच्या कारवाया कराव्या लागत असल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसून येत आहे.अश्यातच दिवाळी सणाच्या काळात तब्बल आठ दिवस बंद असलेल्या सटोरी गँगचा अड्डा म्हणजेच ‘सट्टा-पट्टी’ परत उद्या,सोमवार २७ ऑक्टोंबरपासून पूर्ववत सुरू होणार असून आतातरी स्थानिक पोलीस प्रशासन या अवैध धंद्याकडे लक्ष घालणार काय? असा प्रश्न सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.विशेष म्हणजे,गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल नव्याने रुजू झाले असतांना तब्बल सहा महिने संपूर्ण जिल्ह्यातील सटोरी गँग भूमिगत होऊन सट्टा-पट्टीच्या चिटोऱ्यांवर लगाम लावल्या गेले होते.हे विशेष.
काही ठिकाणी अवैध धंदे सुरू करण्यासाठी स्टेप बाय स्टेप परवानगी घ्यावी लागत असल्याची खमंग चर्चा आहे.जिल्ह्याच्या काही भागात अवैध दारू प्रकरणी एकजण सापडला की,दुसऱ्याला टेंडर,दुसरा सापडला की,तिसऱ्याला टेंडर देऊन ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावली जात असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू आहे.याची चौकशी होणे गरजेचे आहे.अवैध तंबाखू विक्रीचे तर काही खरे नाही.खुलेआम राजरोसपणे अवैध तंबाखूची विक्री सुरू असून प्रकरणी एका दुचाकीवरून विक्री करणाऱ्यास ‘तुम्हाला कुणी पकडत नाही कां?’ असे विचारले असता,इथे पैसा बोलतो; बाकी काहीही नाही.तुम्ही कितीही बातम्या लावा आम्हाला कसलाही फरक पडणार नाही; असे उत्तर देऊन विषयावर बोलणे टाळले.कित्तेक दुकानदार किराणा दुकानाच्या आड अवैध तंबाखू विक्री करीत आहेत.महत्वाचे म्हणजे, चार आणे,पन्नास पैसे सामानांवर भेटतात,तर मोठी रक्कम तंबाखू विक्रीवर गोळा होत असते.त्यामुळे कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सुधरणार कसे? अशी अवस्था झाली आहे.सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांविषयी स्थानिक पोलीस प्रशासनास माहिती नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गुरुवार १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी पहाटे देसाईगंज-लाखांदूर टी-पॉइंटजवळ गडचिरोली एलसीबी पथकातील पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सरिता मरकाम,धनंजय चौधरी,सचिन घुबडे,रामदास उईनवार आणि प्रेमानंद नंदेश्वर यांनी दारू तस्करीबाबत ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली होती.यावर एक नजर टाकली तर जिल्हा स्तरावरील पथक कारवाई करतोय तर..स्थानिक पथक..विषयावर न बोललेलं बरं..! त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर लक्ष घालणार कोण? स्थानिक पोलीस प्रशासन की, एलसीबी पथक? सध्यातरी प्रश्न अनुत्तरित असून पुढील येत्या काळात कळणार.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!