Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचे आयोजन..

उद्यापासून मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचे आयोजन उद्यापासून गडचिरोली पंचायत समिती येथे  करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासन,सामाजिक न्याय विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन उद्या १० मार्च ते १२ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.या प्रदर्शनात शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजना,दिव्यांग आणि वृद्धांसाठी उपलब्ध सहकार्य, तसेच अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती छायाचित्र आणि मल्टीमीडियाच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत.प्रदर्शनाचे उद्घाटन अडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्या सोमवार १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारी योजनांची माहिती घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!