- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाने यंदा जोरदार तयारी केली आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून दहावीची परीक्षा उद्या शुक्रवार २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या शुक्रवार २१ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. यंदा दहावीचे १६ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेमुळे राज्य मंडळाला अधिक सजग राहावे लागणार आहे.दोन्ही परीक्षांसाठी तब्बल १ लाख ८० हजारांवर मनुष्यबळ कार्यरत राहणार असल्याचे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.राज्य मंडळाने गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.त्यामुळे बारावीच्या परीक्षेत दैनंदिन गैरप्रकार वगळता अद्याप तरी मोठा कोणताही गैरप्रकार झाला नसून परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.दहावीच्या परीक्षेला राज्यातील १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ५ हजार १३० केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.दहावीची परीक्षा देणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थीनींपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.उद्या शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेला सुरूवात होणार असून १ मार्चला अवघड समजल्या जाणाऱ्या इंग्रजीचा पेपर आहे.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.दहावी-बारावी परीक्षेत जर शिक्षकांचा सहभाग आढळला तर त्यांना थेट निलंबित करण्यात यावे,असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे शिक्षकही धास्तावले असून कॉपी प्रकरणांपासून दूरच राहत असल्याचे दिसून येत आहेत.त्यामुळे बारावीच्या परीक्षेत अद्यापतरी कॉपी प्रकरणात थेट शिक्षकांचा सहभाग आढळून आलेला नाही.त्याचपध्दतीने दहावीच्या परीक्षेत देखील शिक्षक कॉपी प्रकरणांपासून दूर राहतील याची दक्षता राज्य मंडळाकडून घेण्यात आली आहे.
- Advertisement -

