Sunday, May 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.त्यानुसार, उद्या,सोमवार ४ मे रोजी विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.यात चंद्रपूर,गडचिरोली यवतमाळ आणि वर्धा या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.या ठिकाणी वादळी वारे,विजांचा कडकडाट आणि काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.याशिवाय नागपूर,गोंदिया,भंडारा,बुलढाणा, अकोला,अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.तर मंगळवार ५ मे रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच,बुधवार ६ मे रोजी कोकण पट्ट्यातही हवामान बदलण्याचे संकेत आहेत.विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडतांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!