Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीआलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून ३१ मार्च २०२७ पर्यंत संपूर्ण रस्ता वाहतुकीस सुयोग्य करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच कामाची महिनानिहाय उद्दिष्टे निश्चित करून त्यानुसार प्रगतीचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.
अहेरी तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी आलापल्ली-सिरोंचा मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करत महामार्गाची सध्यास्थिती,सुरू असलेली कामे,अपूर्ण भाग तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या ठिकाणांची पाहणी केली.रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर यावेळी उपस्थित होते.
दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३-सी व संबंधित रस्त्यांच्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील मुख्य काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत,तर महामार्गावरील उर्वरित कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील विलंब टाळण्यासाठी केवळ अंतिम मुदतीच्या आधारे आढावा न घेता प्रत्येक महिन्यासाठी कामाचे निश्चित उद्दिष्ट ठरवावे आणि त्यानुसार प्रत्यक्ष प्रगतीचे मूल्यमापन करावे, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले.निर्धारित महिनानिहाय उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदाराला तात्काळ नोटीस बजावावी तसेच नियमानुसार आवश्यक दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.
पुढील तीन महिन्यांत मंजूर महिनानिहाय नियोजनानुसार अपेक्षित प्रगती दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी.अंतिम मुदतीपर्यंत वाट न पाहता प्रत्येक महिन्यात कामाच्या प्रगतीचे काटेकोर मूल्यमापन करावे,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच लगाम-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३-सीचे संबंधित काम ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.कंत्राटदाराच्या कामाचा मासिक प्रगती अहवाल निर्धारित नियोजनाच्या अनुषंगाने नियमितपणे सादर करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले.
महामार्गाच्या कामाचा वेग वाढवितांनाच गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही,याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी.निर्धारित महिनानिहाय उद्दिष्टांनुसार कामाची प्रगती सुनिश्चित करावी तसेच विलंब झाल्यास संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!