Wednesday, October 14, 2026
Homeकुरखेडाआमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार १२ ऑक्टोंबर २०२६ रोजी घडली.प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज बुधवारी आश्रमशाळेला भेट देत परीस्थितीचा आढावा घेतला.यावेळी उपस्थित कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्याशी चर्चा केली व मृतक विद्यार्थिनीच्या कूटूंबियांची भेट घेत सांत्वन केले.यावेळी आमदार मसराम यांनी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत त्यांना धिर दिला.तसेच मूख्याध्यापक सुनिल मिसार यांचाशी प्रकरणाची सखोल माहिती घेतली व विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचाशी सूद्धा चर्चा करीत मुलीने आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेण्यास कोणती परीस्थिती कारणीभूत ठरली,याबाबत सखोल चौकशी करण्याची सूचना केली.यानंतर मोहगांव येथे मृतक विद्यार्थिनीच्या कूटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी कुरखेडा कांग्रेस तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी,माजी सभापती गिरीधर तितराम,माजी सरपंच दादाजी प्रधान,माजी उपसरपंच झूनूकलाल चौधरी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वनिता नैताम,वर्षा किरंगे,योगेश हलामी,ग्रामपंचायत सदस्य मनोहर दहिकर,प्रकाश गोटा,मोहन प्रधान आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

देसाईगंजात पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्या.. -डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन नसल्याने पत्रकारांना बैठका,पत्रकार परिषदा,प्रशिक्षण कार्यक्रम,दस्तऐवजांचे जतन तसेच विविध संघटनात्मक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही समस्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!