Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता होणार एक देश एक निवडणूक; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठीत मंजुरी

आता होणार एक देश एक निवडणूक; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठीत मंजुरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठीत मंजुरी मिळाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.यामध्ये वन नेशन वन इलेक्शन निवडणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.याला एकमताने मंजुरी देण्यात आली.
२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश एक निवडणुकीवर भर देत आहेत.आता तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने मंत्रिमंडळात याला मंजुरी दिली आहे.आता राज्यसभा आणि संसदेत हा प्रस्ताव ठेवण्यात येईल.
शरद पवार,उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील महत्वाच्या नेत्यांनी याआधीच वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला सहमती दर्शवली होती.’एक देश-एक निवडणूक’ या प्रस्तावाला मोदी सरकारच्या कॅबिनेटकडून मंजुरी मिळाली आहे.हा प्रस्ताव माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने दिला होता.माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने या एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव मार्च महिन्यात सादर केला होता.या प्रस्तावातून समितीने अनेक सूचना केल्या आहेत.या प्रस्तावात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर पुढे १०० दिवसांनंतर स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजे; अशा सूचना केल्या आहेत.यामुळे देशातील निवडणुका निश्चित कालावधित घेता येईल.सध्या राज्य विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या घेतल्या जातात.दरम्यान,माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने ६२ राजकीय पक्षांशी संपर्क केला होता.यापैकी ३२ राजकीय पक्षांनी एक देश,एक निवडणुकीला पाठिंबा दर्शवला होता.तर १५ पक्ष या प्रस्तावाच्या विरोधात होते.तर १५ राजकीय पक्षांनी या प्रस्तावावर कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले नाही.
एनडीए सरकारमधील भाजप व्यतिरिक्त जेडीयू, एलजेपी (आर) या राजकीय पक्षांनी प्रस्तावाला पांठिबा दिला आहे.तर टीडीपी पक्षाने या प्रस्तावाबाबत कोणतेही भाष्य केले नाही.जेडीयू आणि एलजेपी या पक्षाने या प्रकारच्या निवडणुकीमुळे पैशांची बचत होईल; अशी प्रतिक्रिया दिली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!