- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-उपअधीक्षक भूमी अभिलेख गडचिरोली यांच्या कार्यालयात सेतु केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक संगणकीकृत भू-प्रणाम केंद्राची स्थापना करण्यात आली असून,सदर केंद्राचे उद्घाटन आज,शुक्रवारी ४ एप्रिल रोजी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.या केंद्रामार्फत नागरिकांना मिळकत पत्रिका,सातबारा उतारा,रंगीत नकाशा तसेच अन्य आवश्यक अभिलेख शासकीय शुल्क भरून एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांत चकरा मारण्याची गरज भासणार नसून वेळेची बचत होईल.भू-प्रणाम केंद्रामुळे शासकीय सेवा नागरिकांच्या दारी येणार आहेत.हे केंद्र नागरिकांसाठी पारदर्शक व जलद सेवा पुरविण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल,असे सूर्यवंशी यांनी सांगितले.याप्रसंगी मौजा-चुरमुरा येथील मनोहर नानाजी राऊत आणि रत्नमाला पत्रु लोणारे यांना स्वामित्व योजनेअंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात सनद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला भूमी अभिलेखच्या अधिक्षक नंदा आंबेकर,उपअधिक्षक योगेश कांबळे,जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
- Advertisement -

