Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता ठराविक कालावधीशिवाय पुढच्या सिलेंडरची बुकिंगच होणार नाही.. - गॅस घेतेवेळी ओटीपी...

आता ठराविक कालावधीशिवाय पुढच्या सिलेंडरची बुकिंगच होणार नाही.. – गॅस घेतेवेळी ओटीपी सांगणे बंधनकारक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गॅस पुरवठा कंपन्यांनी सिलेंडर गॅस बुकिंगमध्ये अंतर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आता गॅसधारक ग्राहकांना ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या सिलेंडरसाठी बुकिंग करता येणार नाही.विशेषतः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.१४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरसाठी आता बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आले आहे.ज्या ग्राहकांकडे डबल सिलिंडर कनेक्शन आहे; त्यांना आता एका सिलेंडरनंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती.गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचबरोबर,गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लावले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढच्या बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.सिंगल सिलेंडर कनेक्शन म्हणजेच ज्याच्याकडे एकच गॅस सिलेंडर आहे,ते डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतील.ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी नियम अधिक कडक केले आहेत.त्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे. ओटीपी (OTP)आणि ई-केवायसी (e-KYC)हे महत्त्वाचे असेल.गॅस घेतेवेळी ओटीपी सांगणे आता बंधनकारक आहे.तसेच,ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही,त्यांचे बुकिंग रद्द केले जाऊ शकते.शासन एका वर्षात १२ सिलेंडरवर सबसिडी देते.जर एखाद्या ग्राहकाने आपला हा कोटा पूर्ण केला असेल,तर १३ व्या सिलेंडरसाठी त्यांना गॅस कंपनीच्या ॲपवर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या,घरी पाहुणे आले आहेत का?किंवा घरात काही कार्य आहे का?अशी माहिती द्यावी लागेल.या माहितीची पडताळणी केल्यानंतरच कंपनी अतिरिक्त गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!