Friday, July 10, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग शिबिर संपन्न; १७२ रुग्णांची तपासणी..

कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग शिबिर संपन्न; १७२ रुग्णांची तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे विशेष दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID)तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरात तालुक्यातील व परिसरातील एकूण १७२ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.या शिबिरामध्ये विविध विभागांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सामान्य औषधवैद्यक (Gen Med) विभागातून सर्वाधिक १३६ रुग्णांची तपासणी झाली, तर शस्त्रक्रिया(Surgery)विभागात ११० रुग्णांनी नोंदणी केली.तसेच अस्थिव्यंग(Ortho) विभागात ७६, बालरोग(Paediatric)विभागात ३७ आणि नाक-कान-घसा(ENT)विभागात १३ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांनी एकापेक्षा जास्त आजारांसाठी तपासणी करून घेतल्याने विभागनिहाय आकडा मोठा असला तरी,एकूण १७२ पात्र लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा मुख्यालयाची पायपीट करावी लागू नये,याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी हे शिबिर स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश दिले होते.त्यांच्या नियोजनाखाली डॉ.अमित ठमके,वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा यांनी विशेष पुढाकाराने पार पडलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांचे नावनोंदणी व तपासणीचे काम सुलभ झाले आहे.
सदर शिबीरामध्ये डॉ.इंद्रजीत नागदेवते(भिषक),डॉ. सचिन कवाडकर(भिषक),डॉ.बाळू सहारे (अस्थीरोगतज्ञ),डॉ.मिथिलेश आत्राम(बालरोगतज्ञ), डॉ.मस्के(नेत्ररोगतज्ञ),डॉ.अजय कांबळे(ENT),डॉ. कमलेश परसवाणी(शल्य चिकित्सक)तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञ चमूने मोलाचे सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर...

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत.. – शेतकरी,एफपीओ,सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतमालाचे मूल्यवर्धन,सुरक्षित साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'कृषी पायाभूत सुविधा निधी' योजनेअंतर्गत आकर्षक आर्थिक सहाय्य...

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!