- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत ‘आरक्षित’ केलेल्या तिकिटांवर किंवा ‘ई-पास’वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून शासनमान्य एक मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.रेल्वे प्रवाशांच्या तिकिटांची सत्यता आणि वैधता तपासण्यासाठी मध्य रेल्वेकडून १ ते ३१ ऑक्टोंबर २०२६ दरम्यान सखोल तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे.या अंतर्गत एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास,त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. एकानेही ओळखपत्र सादर न केल्यास ‘पीएनआर ‘वरील सर्व प्रवाशांना दंड आकारला जाणार आहे.आधार कार्ड,मतदार ओळखपत्र,पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट,बँक पासबुक,विद्यार्थी ओळखपत्र,केंद्र किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र व दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले यूडीआयडी कार्ड वरीलपैकी एक ओळखपत्र दाखवावे लागेल.मध्य रेल्वेचे महाराष्ट्रात ५ प्रमुख विभाग आहेत.यामध्ये मुंबई,पुणे,भुसावळ,नागपूर व सोलापूर येथून राज्यभर धावणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या आरक्षित रेल्वेगाड्यांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असून या सर्व ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.प्रवासामध्ये एकानेही मूळ ओळखपत्र सादर न केल्यास सर्व प्रवाशांना विनातिकीट मानले जाणार आहे.तसेच,ई-पास,पीटीओवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा शासनमान्य मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ई-पास,पीटीओच्या बदल्यात प्रवासासाठी आवश्यक अधिकृत तिकीट,पास मिळवला आहे याची खात्री करून घ्यावी,असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

