Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीआजपासून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेस प्रारंभ..

आजपासून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेस प्रारंभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना,राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि कडधान्य अभियान या महत्त्वाकांक्षी योजनांचा राष्ट्रीय स्तरावर आज,शनिवार ११ ऑक्टोंबर शुभारंभ करण्यात आला.याच अनुषंगाने, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित शेतकऱ्यांना या योजनेविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून बोलतांना जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आणि प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.कृषी,पशुसंवर्धन, मत्स्य विभाग तसेच केंद्र आणि राज्याच्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळवून देण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
योजनांचे एकत्रीकरण आणि पाच प्रमुख उद्दिष्ट्ये👇
गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांची (पालघर,रायगड,धुळे,छत्रपती संभाजीनगर,बीड, नांदेड,यवतमाळ,चंद्रपूर)या ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी’ योजनेत निवड करण्यात आली आहे.कमी उत्पादकता आणि अपुऱ्या सिंचन क्षमतेवर मात करून शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जिल्हाधिकारी पंडा यांनी योजनेच्या पाच प्रमुख उद्दिष्टांवर भर दिला: यात
१.कृषी उत्पादकता वाढवणे: महाराष्ट्रात,विशेषत: गडचिरोली जिल्ह्यात, पीक उत्पादकता वाढवण्याला मोठा वाव आहे.
२.पीक विविधीकरण : केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता,शेतकऱ्यांनी कोणकोणती पिके घ्यावीत,यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.मुलचेरा येथील शेतकरी लवकर काढणी(अर्ली हार्वेस्टिंग)करून रब्बीसाठी भाजीपाला प्रक्रिया करू शकतात,असे उदाहरण त्यांनी दिले.
३.साठवण क्षमता वाढवणे: जिल्ह्याची साठवण क्षमता आणि पायाभूत सुविधा वाढवणे.
४.सिंचन व्यवस्था सुधारणे: सिंचन,लघु पाटबंधारे, मृद व जलसंधारण आणि मामा तलाव यांसारख्या विविध स्रोतांद्वारे सिंचन सुविधा वाढवण्यावर योग्य उपाययोजना करणे.
५.आर्थिक लाभ आणि सबसिडी: केंद्र आणि राज्य सरकारच्या ११ विभागांच्या ३६ हून अधिक योजना एकत्र आणल्यामुळे,शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आणि सबसिडी(अनुदान) याबद्दल क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करावे,असे निर्देश त्यांनी दिले.
नैसर्गिक शेती आणि कडधान्यांवर लक्ष केंद्रित👇
कडधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,जेणेकरून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबवून पर्यावरणाचा समतोल राखणे आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे यावरही भर देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी पंडा यांनी शेवटी सांगितले की,ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.क्लस्टर पद्धतीने काम करून कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वांनी लक्ष घालावे आणि निश्चितच यश मिळवावे,असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर,मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल मोरघडे,कृषी व संलग्न विभागातील अधिकारी/कर्मचारी,कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ,पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!