Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीआजपासून ते २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताह..

आजपासून ते २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले आहे.
जलसंपदा विभागाच्या वतीने आज,रविवार १६ मार्च पासून ते येत्या २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात आज पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युथ अधिकारी अमित पुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अभियंता गणेश परदेशी,कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरुण वसवाडे,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअरचे संस्थापक आणि जलसंवर्धन सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट तसेच जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या अधीक्षिका श्रीमती गुरपुडे उपस्थित होत्या.
यावेळी उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी जलजागृती सप्ताहाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.तर कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण,जलप्रदूषण टाळणे तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले.यासोबतच जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये जलप्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१६ ते २२ मार्च या सप्ताहात जिल्हा,तालुका व गावपातळीवर जलप्रतिज्ञा,चर्चासत्रे,वेबिनार,चित्रकला व रांगोळी स्पर्धा,कार्यशाळा,जलदिंडी,प्रभातफेरी आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्थळी भेटी यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास पुंडे,वासवाडे,हेपट आणि श्रीमती गुरपुडे यांनी जलसंवर्धनाविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन भांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यात सर्व उपस्थितांनी सामूहिक जलप्रतिज्ञा घेतली.या कार्यक्रमाला जलसंपदा व पाटबंधारे विभागाचे अधिकारी,कर्मचारी,नागरिक, प्रशिक्षणार्थी परिचारिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!