Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या 
प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.आज गुरुवाच्या सकाळपासूनच सर्वत्र पाऊस सुरू असल्याने नदी,नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत.अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती उद्भवलेली असतांनाच पुरामुळे आज गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २५ मार्ग सायंकाळच्या सुमारास बंद पडली आहेत.यात गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार खालील मार्गांचा समावेश आहे.
  • पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
१)आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ३५३C
(मोसम नाला)
२)आष्टी-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ३५३C(दिना नदी)
3)कुरखेडा-वैरागड रस्ता राज्यमार्ग-३७७ (सती नदी) (ता-कुरखेडा)
४)एटापल्ली-कसनसूर रस्ता राज्यमार्ग ३६३ (ता. एटापल्ली झुरी नाला)
५)गट्टा नाका ते एटापल्ली पोचमार्ग स्थानिक नाला
६)धानोरा ते रांगी रस्ता राज्यमार्ग ३६८ (ता.धानोरा)
७)रोमपल्ली झिंगानूर रस्ता प्रजिमा २६(ता.सिरोंचा)
८)एटापल्ली गट्टा रस्ता राज्यमार्ग ३८१ (ता.एटापल्ली)(बांडिया नदी पूल,अलदंडी पूल, तुमरगुडा नाला व जांबिया गावाजवळ,नेंडेर गावाजवळ )
९)मुलचेरा आलापल्ली रस्ता राज्यमार्ग ३७० (ता. मुलचेरा)
१०)अहेरी देवलमारी वट्रा रस्ता राज्यमार्ग ३७० (वट्रा नाला)
११)पोटेगाव-देवापूर-घोट रस्ता राज्यमार्ग ३७८(ता. गडचिरोली)
१२)कसनसूर रेगडी रस्ता राज्यमार्ग ३८० (ता. एटापल्ली(वेनापूर, झरी, कोटमी जवळ)
१३)एटापल्ली देवदा(हेटलकसा गावाजवळ )
१४)आष्टी एल्लूर चौडमपल्ली प्रजिमा ५३ ता. चामोर्शी(चौडमपल्ली नाला )
१५)गणपूर विठ्ठलपूर रस्ता प्रजिमा ५४ (ता.चामोर्शी) (चांदेश्वर नाला)
१६)वैरागड-देलनवाडी प्रजिमा ८ (ता.आरमोरी)
१७)ताडगाव दामरंचा रस्ता (ता.भामरागड)
१८)वैरागड-रांगी रस्ता राज्यमार्ग ३६८ (ता.आरमोरी)
१९)घोट सुभाषग्राम रस्ता राज्यमार्ग ३७८ (ता. चामोर्शी)
२०)कढोली ते उराडी प्रजिमा ७(ता.कुरखेडा)
२१)चांडाळा गुरवळा रस्ता राज्यमार्ग ३७९(ता. गडचिरोली)
२२)घोट-रेगडी रस्ता राज्यमार्ग ३८०(रेगडी जवळ )
२३) कुरुड-वडसा रस्ता प्रजिमा ४७ (ता.देसाईगंज)
२४) कासावी-उसेगाव-कोरेगाव प्रजिमा ४९(ता. देसाईगंज)
२५)चातगाव-रांगी प्रजिमा ३६ (ता.गडचिरोली)(खुर्सा गावाजवळ)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!