- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मोठ-मोठ्या शहरांमध्ये उंचच-उंच इमारती उभारल्या जातात.जिकडे पाहावे तिकडे वर मान केल्याशिवाय पर्याय नाही.अशातच कुशीत असतांना आईचा पाय घसरल्याने हातातील बाळ थेट २१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या विरार पश्चमी येथील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीत काल,बुधवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.
विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीच्या २१ व्या मजल्यावर वास्तव्यास होते. त्यांना सात वर्षांनी मुलगा झाला होता.त्याचे नाव व्रिशांक उर्फ वेदला असे ठेवले.घटनेच्या वेळी मुलास झोप येत नसल्याने त्याची आई पूजा सेदानी या त्याला कुशीत घेत बेडरूममध्ये फिरत होत्या.थोडी हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली.तिथली फरशी ओलसर असल्याने पूजा यांचा पाय घसरला आणि त्या बाल्कनीच्या दिशेने पडल्या,यात त्यांचे कुशीत असलेले बाळ बाल्कनीमधून थेट खाली पडले.यानंतर तातडीने बाळाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

