Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीअन्यथा 'या' कारणामुळे रेशन होणार बंद...

अन्यथा ‘या’ कारणामुळे रेशन होणार बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गरीब तसेच गरजूंना धान्य मिळावे; यासाठी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वितरण केले जाते.दरम्यान, पुरवठा विभागाद्वारे रेशन कार्डधारकांच्या कुटुंबातील सर्व लाभार्थीची ई-केवायसी करण्याची सूचना मागील काही महिन्यांपासून दिली आहे.राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे” होण्यासाठी सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई केवायसी करणे आवश्यक आहे.असे असले तरी अनेकांनी ई-केवायसी केलीच नाही.त्यामुळे आता जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील ई-केवायसी न केलेल्या कार्डधारकांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे.
रेशन दुकानदारांकडे आधार कार्डचा क्रमांक दिल्यानंतर त्यांच्याजवळील मशीनद्वारे ई-केवायसी करता येते.त्यामुळे ज्या लाभार्थींनी अजूनपर्यंत ई-केवायसी केलेली नाही; अशांनी रेशन दुकानदारांकडे जाऊन लवकरात-लवकर ई-केवायसी करून घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!