Friday, May 1, 2026
Homeनागपूरचालकाचा ताबा सुटला; अनियंत्रित ट्रक कारवर धडकला.. - एकजण ठार..

चालकाचा ताबा सुटला; अनियंत्रित ट्रक कारवर धडकला.. – एकजण ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेल्या मिक्सर ट्रकने समोरील कंटेनरला जोरात धडक दिली आणि त्यानंतर विरुद्ध बाजूला असलेल्या कारवर आदळला.या विचित्र अपघातात चालकाचा मृत्यू झाला.ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा महामार्गावरील जामठा टी-पॉइंट येथे काल,रविवारी २९ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
रामलाल गोपीलाल चव्हाण वय ५७ वर्षे,रा.गुढा, भिलवाडा,राजस्थान असे मृताचे नाव असून,तो या दोन ट्रकपैकी एकाचा चालक असावा,अशी माहिती पोलिसांनी दिली.तो नेमके कोणते वाहन चालवीत होता,याचा तपास हिंगणा पोलिस करीत आहेत.
या घटनेतील फिर्यादी कारचालक स्वप्निल हुलके,रा. मानेवाडा,नागपूर हे आपल्या कारने कार क्रमांक- एमएच-४९/सीडी ९४१२ जामठा चौकात आले व त्यांना वर्धा लेनवरून नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर जाण्यासाठी यूटर्न घेण्यासाठी थांबले होते.त्याच वेळी केए-४१/डी-४४१५ क्रमांकाचा कंटेनरसुद्धा नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर चौकात आला व त्यालाही चौकातून यूटर्न घेऊल वर्ध्याकडे जाणाऱ्या लेनवर जायचे असल्याने कंटेनरही चौकात आला होता.
दरम्यान,नागपूरकडे जाणाऱ्या लेनवरून सुसाट वेगाने येणाऱ्या टीएस-२२/टी-९४२३ क्रमांकाच्या मिक्सर ट्रकने कंटेनरच्या केबिनकडील भागात जोरात धडक दिली आणि दुसऱ्या लेनवर उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळला.यात कंटेनर चालक व आणखी एक चालक जखमी झाले.पहाटेच्या सुमारास मार्गाने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली व जखमी दोघांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रशांत ठवरे,पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघ हे पोलिस कर्मचाऱ्यांसह पोहोचले.घटनास्थळी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी मिक्सर ट्रकच्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (अ),३२४ (५),सहकलम १८४,१७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास हिंगणा पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!