- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व ग्राम रोजगार सहायकांना माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील दरमहा ८ हजार रुपये प्रमाणे एकूण सहा महिन्यांचे मानधन अदा करण्यासाठी एकूण १३५ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण (BEAMS)प्रणालीद्वारे आयुक्त,विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण),महाराष्ट्र नागपूर यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार,आयुक्त,विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण),महाराष्ट्र नागपूर यांनी ग्राम रोजगार सहायकांच्या मानधनासाठीचा सदर निधी हा ‘आरटीजीएस’ द्वारे जिल्हानिहाय मानधन रकमेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या खात्यात वर्ग करुन गट विकास अधिकारी यांच्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतींना वितरीत करावा,असे स्पष्ट करण्यात आले आहे.या संदर्भात १४ ऑक्टोंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग (रोहयो)ने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सदरचा निधी खर्च करण्यात यावा व निधी ज्या प्रयोजनाकरीता मंजूर करण्यात आलेला आहे,त्याच प्रयोजनाकरीता खर्च करण्यात यावा अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल. तसेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण)(VB-GRAM-G)या योजनेंतर्गत आयुक्त विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण),महाराष्ट्र नागपूर कार्यालयाला वितरीत करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र(Utilization Certificate) विहित नमुन्यात १५ दिवसांत अनुपालन अहवालासह शासनास सादर करण्यात यावा,असेही स्पष्ट करण्यात आल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रलंबित मानधन मिळणार असल्याने राज्यातील ग्रामरोजगार सहायकांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -

