Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीअखेर पुरात अडकलेले चार विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परिक्षेसाठी दिल्लीला रवाना..! -पुरामुळे चार...

अखेर पुरात अडकलेले चार विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परिक्षेसाठी दिल्लीला रवाना..! -पुरामुळे चार दिवसांपासून होते अडकून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भामरागड तालुक्याच्या पर्लकोटा नदीच्या पुरामुळे मागील चार दिवसांपासून अडकून पडलेल्या चार विद्यार्थ्यांना अखेर प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.सदरचे विद्यार्थी दिल्ली येथे येत्या,२३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या केंद्र सरकारच्या दिल्ली सबऑर्डीनेट सर्व्हिसेस सीलेक्शन बोर्ड(DSSSB)विभागाच्या परीक्षेसाठी जाणार होते.
पुराच्या पाण्यामुळे भामरागड शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आज,बुधवार २० ऑगस्ट रोजी विशेष मोहिम राबवून एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे पोहोचविण्यात आले.यानंतर त्यांना पुढे दिल्लीच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन तहसील प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार महसूल प्रशासन,नगरपंचायत भामरागड तसेच एचडीएफ टीमने समन्वय साधून ही मोहिम यशस्वी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!