Wednesday, September 2, 2026
Homeकोंढाळाअखेर कोंढाळा येथील महिलेचा सर्प दंशाने मृत्यू…

अखेर कोंढाळा येथील महिलेचा सर्प दंशाने मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

कोंढाळा(देसाईगंज) :-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील एका ६५ वर्षीय महिलेला तिच्या राहत्या घरी नाग सापाने दंश केल्याची घटना मागील आठवड्याच्या सोमवार, दिनांक-१ जुलै ला घडली होती.सापाने दंश करताच क्षणाचाही विलंब न लावता महिलेला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.आठवडाभरापासून उपचार सुरू असतांनाच काल,सोमवार दिनांक-८ जुलै च्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सदर महिलेचा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.सुभद्रा मारोती राऊत वय ६५ वर्षे, रा.कोंढाळा,ता.देसाईगंज, जि.गडचिरोली,असे सर्प दंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,मागील आठवड्याच्या सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान सुभद्रा राऊत ह्या शेतावरून कामे करून आल्यानंतर कुटुंबीयांसाठी आंबील बनविण्याकरीता गव्हाचे पीठ काढण्यासाठी घरामध्ये ठेवलेल्या डब्ब्या जवळ गेल्या असता,त्यांच्या पायाला नाग सापाने दंश केला होता.सापाने दंश केल्याची माहिती मिळताच घरातील कुटुंबीय तसेच शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये शोधाशोध केल्यानंतर खरोखरच नाग साप आढळून आला.सापा बद्दलची माहिती वन विभागास देण्यात आली.त्यानुसार वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सापाला पकडुन जंगलात सोडले.

अशातच कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्वप्रथम रुग्णालय गाठले.उपचाराकरिता सुभद्रा यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,आठवडाभर उपचार सुरू असतांनाही सुभद्रा यांची प्राणज्योत सर्प दंशामुळे मावळली आहे. आज,९ जुलै रोजी राहत्या गावी दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!