Sunday, April 19, 2026
Homeपुणेअखेर अत्याचार करणारा आरोपी अटकेत.. - आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; दोरी तुटल्याने ...

अखेर अत्याचार करणारा आरोपी अटकेत.. – आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; दोरी तुटल्याने प्रयत्न फसला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-बसस्थानक परिसरात उभ्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (बलात्कार) झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली व बुधवारी दुपारच्या उघडकीस आल्याने राज्यात सदर घटनेबाबत सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.पीडित तरुणी मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्याहून फलटणला जाण्यास निघाली होती.त्यातच ती स्वारगेट बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती.अशातच ती बसची वाट पाहत असतांना एक अज्ञात इसम तिच्याजवळ येऊन बोलू लागला व तिची बस दुसरीकडे असल्याचे भासवून तिला दुसऱ्या बसकडे नेले.बसमध्ये कुणीही नसल्याचे पाहून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करून बलात्कार केला व आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला होता.अशातच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच दिवशी फिर्याद आल्यानंतर दीड ते दोन तासात विविध पथके गठीत केली गेली. एसटी डेपोच्या आतील २३ आणि बाहेरील ४८ सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करुन आरोपी निष्पन्न करण्यात आला.आरोपीच्या शोधासाठी पाचशे पोलीस तैनात होते.त्यानुसार पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला काल गुरुवारच्या मध्यरात्री अटक करण्यात आली.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली.आरोपी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील आहे.आरोपीवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.मात्र त्याने स्त्री अत्याचार केल्याचा गुन्हा यापूर्वी केल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डला नाही.आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली.दोरी तुटल्याने त्याचा प्रयत्न फसला.त्याच्या गळ्यावर व्रण आहेत.वैद्यकीय तपासणीनंतर खरे समोर येईल,असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.स्वारगेट एसटी डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी,यासाठी हे पथक पुरावे गोळा करेल.यासाठी विशेष वकील दिला जाणार असून जलदगती न्यायालयात केस चालवणार आहोत,असेही त्यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!