Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीअंगणवाड्यांचे कुलूप अद्यापही बंदच…-संप चिमुकल्यांच्या जीवावर

अंगणवाड्यांचे कुलूप अद्यापही बंदच…-संप चिमुकल्यांच्या जीवावर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात पोषण आहाराचे काम ठप्प आहे. तब्बल महिन्यापासून आंदोलन धगधगते आहे. सेवा समाप्तीच्या नोटिसा पाठवल्यानंतरही आंदोलनाची धग अंगणवाडी सेविकांनी कमी होऊ दिलेली नाही. तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत.एकंदरीत तोडगा निघत नसल्याने अंगणवाडीचे कुलूप अद्यापही उघडलेले नाही.

गेल्या ४ डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पोषण आहारासह विविध कामे खोळंबली आहेत.तालुक्यात संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.याबाबत अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी महत्त्वाच्या आणि हक्काच्या मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपाचे हत्यार उपसले आहे.यापूर्वी त्यांनी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी बालविकास प्रकल्प कार्यालय व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.मात्र,शासन दरबारी या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चा ही काढला तरीही दखल न झाल्याने मुंबईत धडक दिली.तरीसुद्धा शासनाने मागण्या मान्य केल्या नाही.त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामावर रुजून होण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतल्याने अंगणवाड्या १ महिना उलटल्यानंतरही बंद आहेत.त्यामुळे चिमुकलेही अंगणवाड्यातून मिळणाऱ्या सकस आहाराला मुकले आहे.तसेच त्यांचे ऐन वळणावर येणारे शिक्षण बंद झाले.दुसरीकडे गरोदर आणि स्तनदा मातांना मिळणारा पोषण आहारही अंगणवाड्यातून वितरित व्हायचा मात्र तोही गेल्या ४ डिसेंबरपासून बंद झाला. या एकंदर बाबींचा सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा आरोग्यावर सकस आहाराअभावी गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यांवर विपरीत परिणाम दिसू लागल्याने कुपोषितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!