उद्रेक न्युज वृत्त :- ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे.जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.९५ व्या ऑस्कर पुरस्कारांची धमाकेदार सुरुवात झाली असून भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या लघुपटाने हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.दुसरी आनंदाची बातमी म्हणजे भारतीय चित्रपट RRR मधील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंन्गचा पुरस्कार मिळाला.
आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि ‘आरआरआर’ च्या चमूने एकच जल्लोष केला.
RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली आणि त्यांची पत्नी उपासना कामिनेनीसह ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांनी गोल्डन ग्लोब्समध्ये प्रतिनिधित्व केले.या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० च्या ब्रिटिश राजवटीतील भारताचे स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटिश कलाकार रे स्टीव्हनसन, ॲलिसन डूडी आणि ऑलिव्हिया मॉरिस यांचा समावेश होता.
तर दुसरीकडे ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारत भारताच्या The Elephant Whisperers या माहितीपटानं ऑस्कर पटकावला आणि क्षणार्धातच या माहितीपटाला साकारणाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.’द एलिफंट व्हिस्परर्स’ची कहाणी अतिशय असामान्य असून,यामध्ये मनुष्य आणि प्राणी यांच्यातील नातं हळुवारपणे उलगडून सांगण्यात आलं आहे.एक दाक्षिणात्य जोडपे अनाथ हत्ती (रघू)ची जबाबदारी घेतं आणि त्याला वाचवण्यासाठी जी मेहनत करतं यावर माहितीपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.कार्तिकी गोंसालवीसच्या दिग्दर्शनाने साकारलेल्या या माहितीपटाची निर्मिती सिख्या एंटरटेनमेंटने केली आहे.