Wednesday, October 7, 2026
Homeऔरंगाबाद९ लाखांची ऑफर घेऊन परीक्षेस गेला; अंग झडती करताच सापडला..!- शिपाई पदाच्या...

९ लाखांची ऑफर घेऊन परीक्षेस गेला; अंग झडती करताच सापडला..!- शिपाई पदाच्या परीक्षेत घडला प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

औरंगाबाद :- नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेला.मात्र युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले. त्यामुळे परीक्षेचा पेपर देण्याऐवजी त्याच्यासह परीक्षार्थीच्या हातात बेड्या पडल्याचा प्रकार शिपाईपदाच्या परीक्षेत घडला.अविनाश सजन गोमलाडू असे या डमी विद्यार्थ्याचे नाव आहे.तर विकास शाहूबा शेळके असे मूळ विद्यार्थ्याचे नाव आहे.या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दोन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, डमी उमेदवार अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ४ हजार रुपये किमतीचे एटीएम ट्रान्समीटर, ब्लूटुथ डिव्हाइस, मख्खी एअर फोन, मोबाईल आढळून आला. त्याशिवाय मूळ उमेदवाराची कागदपत्रेही अविनाश कडे सापडली आहेत.

हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरून प्रश्नाची उत्तरे मागविणार होता.चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयऑन परीक्षा सेंटरवर हा प्रकार समोर आला आहे.विद्यार्थी मित्राच्या जागेवर परीक्षा देणा-या डमी विद्यार्थी मित्राला एमआयडीसी सिडको पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली होती. तर ज्याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आला होता. त्या मूळ विद्यार्थी मित्राला २ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली आहे.एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की,चिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल झोनचे विभागीय व्यवस्थापक वैभव पवार पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली. दरम्यान,आरोपी अविनाश याने विकासच्या नावावर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला.मात्र त्याची हालचाल संसायस्पद वाटत होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!