- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पूर्वीच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे ‘सर आँखो पे’ असे दिसून यायचे; मात्र, काळानुरूप हळूहळू बदल होऊ लागला आणि ‘तुम कहा हम कहा’ अशी अवस्था हल्ली निर्माण झाली आहे. आताच्या काळात ‘तू असशील आपल्या घरचा’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अशातच अतिदुर्गम, आदिवासी,बहुल,नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या कोरची तहसीलदाराच्या मनमानी कारभार व काम करवून घेतांना अश्लील भाषेच्या वापरामुळे नायब तहसिलदार सह कर्मचारी वर्ग त्रस्त झाल्याने अखेर महसूल कर्मचारी संघटनेने गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन सादर करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सदर प्रकरण असे की,कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम हे कार्यालयातील महसूल कर्मचारी व नायब तहसीलदार यांना मानसिक त्रास देत अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात.संघटनेने याबाबतचे निवेदन काल, १४ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले की,कोरची तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी तहसीलदारांच्या दबावाखाली काम करीत आहेत. कर्मचारी मानसिक तणावात आहेत.तहसीलदारांच्या त्रासामुळे तहसीलमधील काही नायब तहसीलदार व कर्मचारी वैद्यकीय रजेवर गेले आहेत.मागील वर्षी गोदाम लिपिकाचा मानसिक तणावाने मृत्यू झाला.शिवीगाळ व दबाव टाकलेल्या प्रसंगाचे ऑडिओ रेकॉर्डिंग महसूल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली आहे; अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर देंगे, महिला प्रतिनिधी सोनाली कंकलवार, संघटक अल्पेश बारापात्रे उपस्थित होते.
- Advertisement -

