Tuesday, April 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात जबावबंदी आदेश लागू...

गडचिरोली जिल्ह्यात जबावबंदी आदेश लागू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात विविध आंदोलन व कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी तसेच सण व उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली जिल्हा क्षेत्रात १३ ते २७ ऑक्टोंबर २०२४ च्या मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या कालावधीत पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा,उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही.पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. कोणतीही व्यक्ती शस्त्र,सोटे,तलवारी,भाले,दंडे,  बंदुका, सुरे,काठ्या,लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे तसेच यामुळे सभ्यता आणि नितिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे,हावभाव करणे,चित्रे,चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे,त्यांचे प्रदर्शन करणे,त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
सदर आदेश कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी तसेच लग्न समारंभ व प्रेतयात्रेकरिता लागू राहणार नाही; असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!