Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा परिषदेच्या ५० अधिकाऱ्यांद्वारे शाळांतील विद्यार्थी सुरक्षेसंबंधी तपासणी..

जिल्हा परिषदेच्या ५० अधिकाऱ्यांद्वारे शाळांतील विद्यार्थी सुरक्षेसंबंधी तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विद्यार्थ्यांचे सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या २१ ऑगस्ट व २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी त्यांचे अधिनस्त सर्व विभागप्रमुख,गटविकास अधिकारी,सहाय्यक गट विकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी व इतर पर्यवेक्षकीय अधिकारी अशा तब्बल पन्नास अधिकाऱ्यांच्या पथकाद्वारे विविध खाजगी व शासकीय शाळांना भेट देऊन शासन निर्देशानुसार विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सुरक्षेबाबत विविध बाबींचे अनुषंगाने उपाययोजना करण्यात आले किंवा नाही याबाबत तपासणी केली.
सदर तपासणीमध्ये शाळांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासंबंधाने शाळांनी केलेले नियोजन,शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी,शाळेत ठेवण्यात आलेली तक्रार पेटी दर आठवडयात उघडण्यासंबंधाने केलेली कार्यवाही व नोंदी,शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय दिनांक- ४ ऑक्टोंबर २०१६ नुसार राष्ट्रीय बालअधिकार आयोगाचे संकेतस्थळ व पोक्सो ई-बॉक्स बाबतची माहिती शाळांचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे,सखी सावित्री समिती स्थापन करणे व समितीच्या घेतलेल्या बैठका,यासंबंधाने सविस्तर पाहणी करण्यात आली. सदर तपासणी अहवालानुसार निदर्शनास आलेल्या त्रुटींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पुनश्च सविस्तर आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे.
जिल्ह्यांतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या,जिल्हा परिषदांच्या शाळांचे संस्थाचालक,मुख्यध्यापक व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणा यांनी शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे; तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुट्या आढळुन येणार नाही; याची दक्षता घेण्याचे सक्त निर्देश दिलेले आहे.भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाही याबाबत सर्वांनी दक्ष राहावे तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा स्विकारार्य राहणार नाही,विद्यार्थी सुरक्षेबाबत वेळोवेळी शाळांची फेरतपासणी करण्यात येणार असुन भविष्यात विद्यार्थी सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यास सक्त कार्यवाही करण्यात येईल,त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेस प्रथम प्राधान्य देऊन शाळा व्यवस्थापनाने प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व पालक यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत करावयाचे उपाययोजनेमध्ये शाळा व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!