- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चामोर्शी(गडचिरोली):-डोंग्याच्या सहाय्याने नदी पार करीत असताना जोराचा वारा आल्याने डोंगा(नाव) पलटी झाला.त्यामुळे डोंग्यात बसलेली एक महिला व इतर चारजण पाण्यात पडले.चारजण कसेबसे खडकाच्या सहाय्याने बाहेर आले.मात्र,महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना चामोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील वाघोली वैनगंगा नदीघाटावर २७ सप्टेंबरला घडली.गीता नरेंद्र चुदरी वय ३७ वर्षे रा. कोळंबी,ता.मूल असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कोळंबी या गावातील गीता नरेंद्र चुदरी ही महिला शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आपल्या कुटुंबातील योगेश्वर नागमकर,नरेंद्र चुदरी,रत्नमाला नागमकर व नावाडी वासुदेव शेंडे असे पाचजण वाघोली वैनगंगा नदी घाटावरून नवेगाव येथे जाण्यासाठी नावेत बसले. नावेने नदी पार करीत असतानाच जोराच्या हवेने डोंगा पलटी झाला.त्यामुळे सदर महिला नदीमध्ये वाहून गेली.तर चारजण नदीमधील खडकाच्या साहाय्याने जीव मुठीत धरून कसेबसे बाहेर निघाले.घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरू केला.सदर शोध पथकात पोलिस निरीक्षक अमूल कादबाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे, महिला पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार,पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास,बंडू कोसमशिले,पो.ह.शामल पाल,विनायक मस्कर,भावेश वरंगट्टीवार,मनोज शिद्राम,पो.ना.प्रकाश मडावी,होमगार्ड तसेच नायब तहसीलदार राजू वैद्य यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक व एनडीआरएफ टीम आणि बोट व पथकाचा समावेश आहे.
दरम्यान,शोधपथकाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविली.मात्र,महिलेचा पत्ता लागला नाही.दरम्यान, सायंकाळ होताच शोधमोहीम थांबवून पुन्हा दुसऱ्या दिवशी शनिवारी दिवसभर मोहीम राबविण्यात आली.दुसऱ्या दिवशीही मृतदेह आढळून न आल्याने काल,रविवारी २९ सप्टेंबरला सकाळी ६ वाजतापासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
- Advertisement -

