Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत हृदयरोग, कर्करोग व किडनी आजाराच्या रुग्णांना १५ हजाराची...

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत हृदयरोग, कर्करोग व किडनी आजाराच्या रुग्णांना १५ हजाराची आर्थिक मदत… – ‘या’ ठिकाणी सादर करा अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोग, हृदयरोग व किडनीचे आजार असल्यास त्यांना उपचारासाठी अनुषंगीक बाबींकरिता मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.दुर्धर आजाराच्या अधिकाधीक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
जिल्हा परिषदांनी आपल्या कार्यक्षेत्रामधील रहिवाशांचे आरोग्य,सुरक्षितता,शिक्षण इत्यादी किंवा त्यांच्या सामाजिक आर्थिक किंवा सांस्कृतीक कल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १०० (३) मधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांनी आपल्या स्वत:च्या उत्पन्नातून जिल्ह्यातील ग्रामीण जनतेमधून कर्करोग (कॅन्सर),हृदयरोग, किडनी निकामी होणे या दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देण्याची योजना महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे दिनांक- २ नोव्हेंबर १९९५ च्या पत्रान्वये राबविण्यात येत आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आर्थिक मदतीचा लाभ देण्यात येत आहे.यामध्ये रुग्णाला केवळ एकदाच १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.याकरिता  सन २०२४-२५ करिता जिल्हा परिषदेच्या फंडातून पाच लाख रुपये तरतुद करण्यात आलेली असून मागील तीन वर्षात ७५ रुग्णांना लाभ देण्यात आलेला आहे.
अर्ज करण्याच्या नियम व अटी👇
अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे नावे सादर करावा.हृदयरोग व किडनी निकामी होणे या रुग्णांना आर्थिक मदतीचा लाभ सबंधित प्राधिकृत रुग्णालयाच्या नावाने देण्यात येतो व कर्करोग असलेल्या रुग्णांना थेट रुग्णांच्या नावे लाभ देण्यात येतो.हृदयरोग रुग्ण,कर्करोग रुग्ण, किडनी रुग्ण हा गडचिरोली जिल्हयातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा.(रहिवासी प्रमाणपत्र जोडावे)रुग्ण हा भूमीहिन,अल्पभूधारक,दारिद्रय रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास त्यास प्राधान्य देण्यात येते.रुग्ण दुर्धर रोगाने पिडीत असल्याबाबत प्राधिकृत वैद्यकिय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.रुग्णांनी अलीकडील एक छायाचित्र,आधार कार्डची झेरॉक्स व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी,असे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!