- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शालेय परिसर समोरील आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे गुन्हा आहे.बऱ्यापैकी लोकांना याविषयी माहीत असूनही जाणूनबुजून याकडे अनेकजण दुर्लक्ष करतांना दिसून येतात.त्यामुळे नाईलाजास्तव अनेकांना कारवाईस सामोरे जावे लागत असते.असाच प्रकार तिघांच्या बाबतीत उघडकीस आला आहे.शालेय परिसराच्या १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तिघांना पोलिसांनी दणका दिला.तिरोडा व ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत.यामध्ये,तिरोडा तालुक्यातील ग्राम मेंढा येथील अनिल भय्यालाल सूर्यवंशी वय ५१ वर्षे हा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत असताना रविवारी रात्री पोलिस शिपाई रवींद्र चांदेकर यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.
दुसरी कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम फुलचूर येथे करण्यात आली.यामध्ये आरोपी अन्सारअली अख्तर अली सय्यद वय ३७ वर्षे याने हॉटेलच्या काउंटरमध्ये ५ सिगारेट विक्रीसाठी ठेवल्या होते.त्याची हॉटेल शाळा परिसरात असल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार येरमे यांनी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली आहे.तर तिसरी कारवाई चुलोद येथे पोलिस हवालदार मनोज भैसारे यांनी केली आहे.तिसरी कारवाई ग्राम चुलोद येथील शाळेच्या १०० फुटांच्या आतची असून आरोपी भूमेश साबुलाल मेश्राम वय ४५ वर्षे रा.चुलोद हा शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना पोलिसांनी त्याला पकडले.या तिघांवर संबंधित पोलिस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम कलम ६ (ब),२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

