Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीआता 'आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल २.०'.. - घरबसल्या शासकीय कार्यालयातील करा...

आता ‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल २.०’.. – घरबसल्या शासकीय कार्यालयातील करा तक्रारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नागरीकांना त्यांच्या तक्रारी घेऊन शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये; त्यांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा; या उद्देशाने शासनाने ‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल २.०’ उपलब्ध करून दिले आहे.सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पोर्टलच्या तांत्रिक बाबींची व हाताळणीचे परिपूर्ण प्रशिक्षण घेवून नागरीकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल २.०’या पोर्टलचे महत्व,उद्देश,गांभीर्य,शासकीय विभागाची जबाबदारी आदी बाबी अवगत होण्यासाठी मुंबई येथून आलेल्या चमूने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण दिले.जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण सत्राला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,पोलीस अधिक्षक निलोत्पल,अतिरीक्त जिल्हाधिकारी विवेक घोडके,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी,जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील,उपजिल्हाधिकारी भुसंपादन (सामान्य) प्रसेनजित प्रधान यांच्यासह मुंबईवरून आलेले ई गव्हर्नन्स एक्सपर्ट देवांग दवे,तांत्रिक तज्ज्ञ शुभम पै,आपले सरकार पोर्टलचे तांत्रिक सहायक विनोद वर्मा आणि हर्षल मंत्री उपस्थित होते.
‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल २.०’ बाबत अधिकारी,कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतांना देवांग दवे म्हणाले,कोणत्याही विभागाबाबतची तक्रार एकाच प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा या पोर्टलमध्ये करण्यात आली आहे.केवळ राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारच्या विभागाशी संबधित तक्रार सुध्दा येथे नागरीकांना करता येणार आहे.पारदर्शकता,गतीमानता,जबाबदारी आणि लोकांचा विश्वास या चार बाबींवर आधारीत सदर पोर्टल अद्यावत करण्यात आले आहे.
नागरीकांची आलेली तक्रार २१ दिवसांत निकाली काढण्याचे बंधनकारक आहे.जर विहित कालावधीत तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास त्यांची माहिती संबधित तक्रारकर्ता व वरिष्ठ कार्यालयास कळणार असून त्यांचेद्वारे संबंधीत अधिकाऱ्यांवर पुढील कारवाही होईल.शासकीय अधिकारी किंवा विभागाला यात कोणतीही पळवाट काढता येणार नाही.त्यामुळे संबधित तक्रारीवर योग्य आणि वेळेत निर्णय घ्यावा. या पोर्टलमध्ये जास्तीत जास्त ३ हजार शब्दापर्यंत तक्रार नोंदविता येते.आलेल्या तक्रारींचा सकारात्मक पध्दतीने निपटारा व्हावा.शासन स्तरावरून दरमहिन्याला याचा आढावा होत असतो.असे देवांग दवे यांनी सांगीतले.सदर प्रशिक्षणाला सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार विविध विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!