Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरची अफलातून करामत... -शासकीय रुग्णवाहिकेचा वापर करून सवंगड्यांसोबत मिळून करायचा...

गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरची अफलातून करामत… -शासकीय रुग्णवाहिकेचा वापर करून सवंगड्यांसोबत मिळून करायचा दारूची वाहतूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील एका कंत्राटी डॉक्टरची अफलातून करामत जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून १७ सप्टेंबरला उघडकीस आली.एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. एकीकडे तापाने फणफणलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर वाहन उपलब्ध करून न दिल्याने जन्मदात्यांना त्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना १२ दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे उघडकीस आली होती.याच परिसरातील तस्करीच्या घटनेने आता आरोग्य विभागातील वर्तुळ हादरले आहे.
ब्रम्हानंद रैनू पुंगाटी वय २९ वर्षे,रा.बारसेवाडा, ता. एटापल्ली असे डॉक्टरचे नाव आहे.नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. १५ सप्टेंबर रोजी पहाटे हालेवारा पोलिस मवेली हालेवारा पीपली बुर्गी या मार्गावर नाकाबंदी करत होते.यावेळी एमएच ३३ टी ४४७८ ही तेथून जात होती.रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले,पण चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे १० बॉक्स व विदेशी दारूच्या ९६ बाटल्या आढळल्या.पोलिसांनी डॉ. ब्रम्हानंद पुंगाटी याच्यासह शशिकांत बिरजा मडावी वय ३३ वर्षे,रा. एटापल्ली,सौरभ गजानन लेखामी वय २० वर्षे,रा.पिपली बुर्गी,भिवाजी रैनू पदा वय ३१ वर्षे, रा.पिपली बुर्गी यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत दिलीप लालू लेखामी रा.पिपली बुर्गी हा पळून गेला.चारही आरोपींना एटापल्ली न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रम्हानंद पुंगाटी यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे. यात सहभागी अन्य कर्मचारीही रडारवर आहेत. त्यांच्यावरही कारवाई अटळ मानली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!