Tuesday, August 25, 2026
Homeदेसाईगंजअखेर देसाईगंज नगरपरिषदेस पंतप्रधान आवास योजनेचा निधी उपलब्ध...- माजी नगरसेवक तथा आरोग्य...

अखेर देसाईगंज नगरपरिषदेस पंतप्रधान आवास योजनेचा निधी उपलब्ध…- माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन खरकाटे यांच्या पाठपुराव्यास यश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- गेली चार वर्षांपासून देसाईगंज नगरपरिषद हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेचा घरकुल लाभार्थ्यांचा निधी रखडला असल्याने कित्येकांची घरे अपुर्ण स्थितीत असल्याची माहिती देसाईगंज नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन खरकाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः गडचिरोली जील्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे किसन नागदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून सदर बाब निदर्शनास आणून दिल्याने; अखेर पंतप्रधान आवास योजनेतील देसाईगंज नगरपरिषदेस घरकुल लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध झाला असल्याने घरकुल लाभार्थ्यांनी सचिन खरकाटे यांचे आभार मानले आहे.

देसाईगंज नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन खरकाटे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेस येत असतात.गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर व तळमळीने धावून येत असतात.अशाच प्रकारे कोंढाळा येथील एका भीक मागणाऱ्या मुलास शिक्षणाच्या प्रवाहात आणून आजही त्या विध्यार्थ्यास मदतीचा हात देतांना दिसून येत आहेत.कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देसाईगंज नागरपरिषदेकडून सत्कार करण्यात आला.अशी अनेक सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची कामे तळमळीने केली असल्याने सर्वत्र त्यांचे नाव आजही घेतले जाते आहे.

 सचिन खरकाटे यांनी घरकुल लाभार्थ्यांचा पाठपुरावा केला असल्याने नगरपरिषदेस पंतप्रधान आवास योजनेचा निधी उपलब्ध झाला आहे.येत्या काही दिवसात निधी अभावी अपूर्ण असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!