Saturday, July 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेचा निकाल जाहीर…-एकतिसाव्या सत्रात सुभाष धाराशिवकर आठवड्याचे उत्कृष्ट कवी…

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेचा निकाल जाहीर…-एकतिसाव्या सत्रात सुभाष धाराशिवकर आठवड्याचे उत्कृष्ट कवी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे एकतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २८ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात पुणे जिल्ह्यातील कवी सुभाष वामनराव धाराशिवकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “सांजेचे भय.. आवर्तन” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

सुभाष वामनराव धाराशिवकर हे वाकड (पुणे) येथील रहिवासी असून ज्येष्ठ कवी आहेत.त्यांचा ‘रानवाटा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.‌अनेक दिवाळी अंक व मासिकातून ते सातत्याने लिखाण करीत असतात.थोरामोठ्यांच्या स्वाक्षरींचा संग्रह करणे, वेगवेगळे खडक,नाणी व काष्ठशिल्प यांचा संग्रह करणे हा त्यांचा छंद असून मेळघाटातील व्याघ्र गणना मोहीमेत ते अनेकदा सहभागी झालेले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

एकतिविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे,सोनाली रायपुरे,राजेंद्र यादवराव सोनटक्के,सौ.प्रेमिला अलोने,तुळशीराम उंदीरवाडे,उकंडराव राऊत,संगीता ठलाल,शैला चिमड्यालवार,रेखा दिक्षित,विलास जेंगठे,मुरलीधर खोटेले,सुभाष धाराशिवकर,रंजना चुधरी,रोहिणी पराडकर,विलास टिकले,संगीता रामटेके,पुनाजी कोटरंगे,गणेश रामदास निकम,राजरत्न पेटकर,प्रिती ईश्वर चहांदे,प्रियंका वाकडे,किशोर बोरकुटे,मिलींद खोब्रागडे,गजानन गेडाम,सुनिता तागवान,केवळराम बगमारे,मंदाकिनी चरडे,व कु.भावना रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता. पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे चुडाराम बल्हारपुरे(नाटककार) यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

तब्बल सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी सापडली पतीसोबत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.. – भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!