उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आला आहे.नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा वॉरंट काढण्यात आला आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहे.
नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्यांचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.याबाबत धनंजय घोरपडे (रा.वारजे) यांनी फिर्याद दिली होती.त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.मनोज जरांगे पाटील,अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे ६ प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते.प्रत्येक प्रयोगाला ५ लाख याप्रमाणे ३० लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले होते.पण नाटकाच्या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना मिळाले नाहीत.त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

