Friday, October 2, 2026
Homeनांदेडग्रामपंचायत कार्यालयातच पोलिस पाटलाने घेतला गळफास…-गावकऱ्यांनी मृतदेह नेला पोलीस ठाण्यात…

ग्रामपंचायत कार्यालयातच पोलिस पाटलाने घेतला गळफास…-गावकऱ्यांनी मृतदेह नेला पोलीस ठाण्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नांदेड :-वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना आपण समाजात पाहतो. अशीच एक धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे.गावच्या पोलिस पाटलानेच ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवून पोलिस उपनिरीक्षक माझ्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.दरम्यान,नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह आता पोलिस ठाण्यात नेला.सदर घटना ही हदगाव तालुक्यातील पेवा गावातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पेवा गावचे पोलिस पाटील असलेले बालाजी जाधव यांनी आज,२२ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता.त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.पेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. माझ्या मृत्युला पोलिस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे.बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता,मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला,असे मृत बालाजी हे व्हिडिओत म्हणीत आहेत.

याबाबत अधिक माहिती घेतली असता,१५ दिवसांपूर्वी पेवा या गावात एकाचा खून झाला होता. जातीय वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येते,याच घटनेतील आरोपीबद्दल पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली असा वरिष्ठ पोलिसांचा समज होता.त्यातून पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारणा केली होती.पण, आपल्यावर खोटा आरोप होत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आता होत आहे.

या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेला असून, संबंधित वरिष्ठ पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी व बालाजी यांच्या कुटुंबीयांना केली आहे.मात्र,या घटनेमुळे पोलीस खात्यात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी ४३ वर्षीय शिक्षक...

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!