Saturday, October 17, 2026
Homeदेसाईगंज सार्वजनिक शौचालये बनली शोभेची वास्तू-शौचालयाच्या अवती भवती घाणीचे साम्राज्य

 सार्वजनिक शौचालये बनली शोभेची वास्तू-शौचालयाच्या अवती भवती घाणीचे साम्राज्य

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालये शोभेची वास्तू बनल्याने शौचालयाच्या अवती-भवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक शौचालय बांधकामाचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील जणतेंनी नियमित शौचालयांचा वापर करावा,उघड्यावर शौचास बसू नये व हागणदारीमुक्त गाव व्हावा म्हणूनच सार्वजनिक शौचालये ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी बांधली.सुरुवातीला एक ते दोन वर्षे शौचालयांची देखभाल,पाण्याची व्यवस्था,सभोवतालील कचरा व्यवस्थापन व रंगरांगोटी ग्रामपंचायत स्तरावरूनच केली जायची.

मात्र एक ते दोन वर्षांनंतर गावातील सार्वजनिक शौचालयांना जे ग्रहण लागले ते अजूनही ग्रहणाच्या चपाट्यातच शौचालये सापडलेली आहेत.सार्वजनीक शौचालयांची आजची परिस्थिती लक्षात घेता काही शौचालये कुलूपबंद तर काहींची दारे तुटलेली,रंगरांगोटी तर सोडा साधी पाण्याची सोय नाही,त्या काळात लाखो रुपये खर्च करून आज निकामी स्वरूपातील शौचालयांची अवस्था झाली आहे.सार्वजनिक शौचालये हल्ली गावामध्ये उभा व शोभा अशास्थितीत असून सार्वजनिक शौचालयांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सार्वजनिक शौचालयांची अशी अवस्था असेल तर इतर सार्वजनिक ठिकाणांची अवस्था कशी असेल. तरी याकडे गांभीर्याने लक्ष घालून सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून  गावातील शौचालये योग्य स्थितीत सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!