Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीदहा आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी…-पोर्ला वनपरिक्षेत्रातील नीलगाईची शिकार प्रकरण..

दहा आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी…-पोर्ला वनपरिक्षेत्रातील नीलगाईची शिकार प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जंगलात नीलगाईची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना जेरबंद केले.दोन आरोपी फरार आहेत.सदर घटना शनिवारी नवरगाव येथे घडली.आरोपींकडून नीलगाईचे शिर, पाय,मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत.सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

वनविभागाने खुदकम रघुनाथ गेडाम वय २५ वर्षे, रा.कुहाडी,अक्षय प्रभाकर सेलोटे वय २२ वर्षे,रा. नवरगाव,रोशन दामोधर भोयर वय २२ वर्षे,रा. नवरगाव,निखिल गिरिधर ठाकरे वय ३० वर्षे,रा. चुरचुरा,सौरभ सुरेश आवारी वय २० वर्षे,रा. नवरगाव, विक्रांत प्रकाश बोरकुटे वय २३ वर्षे,रा.गोगाव,संकल्प संजय उंदीरवाडे वय २४ वर्षे,रा.नवरगाव,संदीप कानिफ चुधरी रा.नवरगाव,आकाश प्रभाकर सेलोटे रा.नवरगाव,जगदीश देवराव थोराक रा. नवरगाव यांना अटक करण्यात आली आहे.समीर रवींद्र मडावी रा. कुहाडी व ओमराज विजय राजगडे रा.चुरचुरा हे दोघे फरार आहेत.

पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (दक्षिण) नियत क्षेत्रामध्ये १३ जुलै रोजी नीलगाईची शिकार करण्यात आली.शिकारीनंतर नीलगाईच्या मांसाची गावात विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून दहा आरोपींना अटक केली.त्यांना रविवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी,चुरचुराचे क्षेत्र सहायक के.बी.उसेंडी,पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम,मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ,पोर्लाचे वनरक्षक विकास शिवणकर,दिभनाचे वनरक्षक गणेश काबेवार,किटाळीचे वनरक्षक संदीप लामकासे,देलोडाचे वनरक्षक नितीन भोयर, वाहनचालक देवीदास चापले,वनमजूर विजय म्हशाखेत्री,गिरिधर बांबोळे,छत्रपती डहाले,दुर्योधन मेश्राम,सोनू खोब्रागडे,रवि डहाले,रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!