Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीकृषि विभागामार्फत शेतकऱ्यांकरीता पिकस्पर्धेचे आयोजन..-११ पिकांसाठी पिकस्पर्धा; शेतकऱ्यांना मिळणार बक्षीस….

कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांकरीता पिकस्पर्धेचे आयोजन..-११ पिकांसाठी पिकस्पर्धा; शेतकऱ्यांना मिळणार बक्षीस….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- अन्नधान्य,कडधान्य व राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात,ज्वारी, बाजरी,मका,नाचणी (रागी),तूर,मूग,उडीद,सोयाबीन, भुईमुग,सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी👇

पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात,ज्वारी, बाजरी,मका,नाचणी (रागी),तूर,सोयाबीन,भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०  स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य,जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे 👇

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ),ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने सबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/ पासबुक पानाची प्रत.

पिक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप👇

१.तालुका पातळी- पहिले बक्षीस रुपये५०००,दुसरे बक्षीस रुपये ३०००,तिसरे बक्षीस रुपये २०००.

२.जिल्हा पातळी- पहिले बक्षीस रुपये१००००,दुसरे बक्षीस रुपये ७०००,तिसरे बक्षीस रुपये ५०००.

३.राज्य पातळी- पहिले बक्षीस रुपये ५००००,दुसरे बक्षीस रुपये ४००००,तिसरे बक्षीस रुपये ३००००.

तरी खरीप हंगाम सन २०२४ पिक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा; असे आवाहन बसवराज भी. मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.या योजने बाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in किंवा सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!